*नगर परिषदेच्या शहर पाणीपुरवठ्याची वीज पूर्ववत जोडल्याने जलसंकट टळले**थकीत वीजबिलासाठी आ.कैलास पाटील यांची शिष्टाई यशस्वी*

*नगर परिषदेच्या शहर पाणीपुरवठ्याची वीज पूर्ववत जोडल्याने जलसंकट टळले*

*थकीत वीजबिलासाठी आ.कैलास पाटील यांची शिष्टाई यशस्वी*
राहुल कोरे उस्मानाबाद
धाराशिव  -
उजनी शहर पाणी पुरवठा योजनेच्या थकबाकीमुळे थकीत झालेला वीजपुरवठा  ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्या शिष्टाईमुळे महावितरणने पूर्ववत जोडला आहे. त्यामुळे शहरवासीयांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वणवण थांबली आहे. 

धाराशिव नगर परिषदेमार्फत शहराला उजनी धरणातून पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणीपुरवठा करण्यात येतो. नगर परिषद प्रशासनाची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे महावितरणचे पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल थकले आहे. थकबाकी न भरल्यामुळे महावितरणने पाणीपुरवठा योजनेची वीज खंडित केली होती. त्यामुळे दहा दिवसांपासून शहराला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. नागरिकांची पिण्याच्या पाण्यावाचून होणारी गैरसोय लक्षात घेऊन आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, नपचे माजी गटनेते सोमनाथ गुरव, बाळासाहेब काकडे, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे,अजय नाईकवाडी यांच्या शिष्टमंडळाने महावितरणचे अधीक्षक अभियंता कटके व महाद्वार यांची भेट घेऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची विनंती केली. दरम्यान नगर परिषद प्रशासनाला कळवून थकबाकीतील रक्कम भरण्याबाबत सूचना दिल्या. नगर परिषद प्रशासनाने महावितरणच्या अधीक्षक अभियंता यांना पत्राद्वारे पाणी पुरवठा योजनेच्या हातलादेवी पंपहाऊसच्या थकीत वीजबिलापोटी  रक्कम भरणा करुन उर्वरित थकबाकी लवकरच जमा करण्यात येईल असे आश्वासित केले. त्यानंतर महावितरणने हातलादेवी पंपहाऊसचा वीजपुरवठा सुरळीत केला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक