*आर.पी महाविद्यालय आणि तेरणा महाविद्यालय स्वाधार शिष्यवृत्तीच्या प्रस्तावास विद्यार्थ्यांना स्वाक्षरी देण्यास करतात टाळाटाळ !*
*आर.पी महाविद्यालय आणि तेरणा महाविद्यालय स्वाधार शिष्यवृत्तीच्या प्रस्तावास विद्यार्थ्यांना स्वाक्षरी देण्यास करतात टाळाटाळ !*
राहुल कोरे उस्मानाबाद
उस्मानाबाद (प्रतिनिधी) आज दि.17/02/2023 रोजी, उस्मानाबाद शहरातील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय आणि तेरणा महाविद्यालय औरंगाबाद रोड उस्मानाबाद येथील प्राचार्य स्वाधार शिष्यवृत्ती योजनेच्या विद्यार्थ्यांची अडवणुक करत असल्याचे आढळून आले.
या बाबत सविस्तर तशी की, उस्मानाबाद शहरातील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय (R.P Collega) व तेरणा कॉलेज औरंगाबाद रोड उस्मानाबाद या महाविद्यालयाचे प्राचार्य स्वाधार योजनेच्या अंतर्गत प्रस्ताव दाखल करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वाक्षऱ्या देत नाहीत,अशी तक्रार काही विद्यार्थिंनी समाज कल्याण कार्यालय उस्मानाबाद येथे देताना दिसून आल्या.यावेळी या विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता विद्यार्थिनींनी सांगितले की,तेरणा महाविद्यालयाचे प्राचार्य तर चक्क म्हणतात की, तुम्हाला दोन दोन शिष्यवृत्त्या कशासाठी पाहिजे.आम्ही स्वाक्षरी देऊ शकत नाहीत तर आर.पी कॉलेजचे प्राचार्य म्हणतात की, तुम्ही जो फॉर्म आॅनलाईन भरला आहे.त्यावरती सही मागताय,त्या फॉर्म वरती असं कुठे लिहिले आहे की इथे प्राचार्याची सही लागते.अशी अनेक उडवा-उडुवीची उत्तरे विद्यार्थ्यांना देतात. ही बाब निंदनीय आहे.वास्तविक पाहता स्वाधार शिष्यवृत्ती योजना ही ग्रामीन भागातुन शहरामध्ये शिक्षण घेण्यासाठी राहणार्या विद्यार्थ्यांसाठी आहे.इतकी साधी बाब प्राचार्यांना माहित नसेल का ? तर दुसरा महत्वाचा प्रश्न असा की,या महाविद्यालयाचे 100% विद्यार्थी वार्षिक परिक्षेसाठी पाञ ठरतात.तर मग ज्यावेळी विद्यार्थी स्वाधार शिष्यवृत्तीसाठी कार्यालयात जातात त्यावेळी माञ विद्यार्थ्यांची प्रेझेंटी कमी कशी काय असते.तसेच उस्मानाबाद शहरापासुन वरूडावर रोडवर असलेल्या व्हि.जे.शिंदे महाविद्यालयाचे नावच आॅनलाईन सिस्टम मध्ये दिसत नाही.यासंबंधाने चौकशी केली असता,असे सांगतात की हे काॅलेज शहरात नाही.तर विद्यार्थी म्हणतात की,मागच्या वर्षी स्वाधार शिष्यवृत्ती मिळत होती.यातुन या महाविद्यालयात शिक्षण घेणार्या ग्रामीन भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.विद्यार्थ्यांच्या या सर्व तक्रारीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना लेखी निवेदनाद्वारे रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे व तेरणा महाविद्यालयाच्या प्राचार्यांना समज देण्यात यावी तसेच व्हि.जे.शिंदे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना ही स्वाधार शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा यासाठी तात्काळ प्रयत्न व्हावेत असे सुचविण्यात आले आहे.अन्यथा आपल्या कार्यालया समोर वंचित बहुजन आघाडी तीव्र स्वरूपाची आंदोलन करेल असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव,जिल्हा सह-सचिव सोमनाथ नागटिळक,जिल्हा नेते युनुस पटेल,लेखक/संपादक विजय अशोक बनसोडे,सामाजिक कार्यकर्ते मुकेश मोठे, बाळासाहेब धावारे,अनुसूचित जाती-जमाती दक्षता कमिटीचे सदस्य तानाजी गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.