उस्मनाबाद तालुका केमिस्ट संघटनेतर्फे बैठक संपन्न..

उस्मनाबाद तालुका केमिस्ट संघटनेतर्फे बैठक संपन्न..     
   राहुल कोरे आळणीकर  
             उस्मानाबाद जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष श्री धनाजी दादा आनंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद तालुका केमिस्ट संघटनेतर्फे औषधी भवन समर्थ नगर उस्मानाबाद येथे बैठकीचे आयोजन 06 फेब्रुवारी 2023 रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबाद जिल्हयाचे औषध निरीक्षक श्री श्रीकांत पाटील साहेब तर अध्यक्ष स्थानी श्री धनाजी दादा आनंदे हे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शनपर भाषण करताना श्री श्रीकांत पाटील साहेबांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच औषध व्यवसाय करण्याच्या सर्वांना सूचना दिल्या. यावेळी त्यांनी नियमबाह्य पद्धतीने गर्भपाताची औषधे,लैंगिक उत्तेजना निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणारी औषधे,नशेसाठी वापरली जाणारी औषधे यांची खरेदी तसेच विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा दिला.सोबतच सर्व औषधी विक्रेत्याच्या ज्याकाही शंका,अडचणी होत्या त्याबाबत योग्य मार्गदर्शन केले.यावेळी बोलताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री धनाजी आनंदे यांनी देखील नियमात राहूनच व्यवसा यकरण्याच्या सूचना दिल्या. कार्यक्रमासाठी उस्मानाबाद जिल्हा सचिव श्री किरण हंगरगेकर तसेच उस्मानाबाद तालुक्यातील बहुसंख्य औषध विक्रेते उपस्थित होते यामध्ये महिला प्रतिनिधी लक्षणीय संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रस्तावना तालुका अध्यक्ष श्री रोहित फिसरेकर तर आभार प्रदर्शन तालुका सचिवश्री प्रशांत जोशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व तालुका तसेच शहर संघटनेच्या पदाधिकऱ्यांनीही सहकार्य केले.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक