आजच्या मुलींनी माता रमाईचा आदर्श घ्यावा - वनकर


आजच्या मुलींनी माता रमाईचा आदर्श घ्यावा - वनकर 
राहुल कोरे आळणीकर 
उस्मानाबाद दि.७ - माता रमाई आंबेडकर यांनी अतिशय कष्टाने काटेरी संसाराचे नंदनवन केले. त्यांनी कुठल्याही प्रसंगाला न डगमगता जे धिरोदात्तपणे खंबीरपणे उभ्या राहून साथ दिली. आजच्या मुलींनी मोबाईलवरील व्हाट्सअप‌ व फेसबुक या युनिव्हर्सिटीमध्ये न गुंतता पुस्तके वाचावीत. जिल्हाधिकारी, न्यायाधीश,‌ पोलीस अधिकारी बघण्यासाठी माता रमाईचा आदर्श घ्यावा, असे आवाहन वादळ वारा फेम गायक अनिरुद्ध वनकर यांनी केले.
 
उस्मानाबाद येथील लेडीज क्लबच्या मैदानावर माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त शाहीर अनिरुद्ध वनकर यांची रमाईची गाणी आणि अनिरुद्धची वाणी या कार्यक्रमाचे आयोजन दि.६ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन आ. कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वनकर यांनी उपस्थितांना आपले मत विकू नका, सर्वांना घटनेच्या माध्यमातून समता निर्माण करून देणाऱ्या घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना बदलण्याचे प्रयत्न करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या एकाही उमेदवाराला मत देऊ नका असे आवाहन केले.
यावेळी महिला रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ स्मिता गवळी-सरोदे, डॉ चित्रा बोडके, आयोजक माजी नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत, उपाध्यक्ष राहुल वाघमारे, अरुण बनसोडे, विधीज्ञ सुदेश माळाळे, यु.व्ही. माने, दिलीप वाघमारे, सुनील बनसोडे, रावसाहेब शिंगाडे, ए.एस. सरवदे आदी उपस्थित होते. त्यावेळी वनकर यांनी अशी रमाई आहे का सांगा ?...माझी आजी म्हणायची, भीम बनला सावली कोटी-कोटींच्या माथ्यावर...मी वादळ वारा...ऐ पोरा, तु साहेब झालास मोठा, बाबासाहेबांच्या पुण्याईने.... जात आणि धर्माचे बंधन मानत नव्हता, असाच माझा शिवबा होता माणुसकीची खान.. आदी विविध एकापेक्षा एक सरस, क्रांतिकारी व प्रेरणादायक गीतांचे सादरीकरण केले. 

या प्रबोधनात्मक कार्यक्रमाद्वारे उपस्थितांसमोर माता रमाईने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अतिशय खडतर संघर्षातून दिलेली‌ साथ व समाजकार्याचा जाज्वल्य जिवंत करणारा इतिहास उभा केला.   
 यावेळी आयोजन संस्थापक अध्यक्ष व माजी नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत, उपाध्यक्ष राहुल वाघमारे, अरुण बनसोडे, यु.व्ही. माने, दिलीप वाघमारे, सुनील बनसोडे, विधीज्ञ सुदेश माळाळे, रावसाहेब शिंगाडे, ए.एस. सरवदे, सुनील बनसोडे, शांतिनाथ शेरखाने, दीपक सरवदे, श्रीकांत माळाळे, पी.के. बनसोडे, विजय गायकवाड, बाबासाहेब जानराव व सुशांत सोनवणे आदींसह भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

चौकट

यावेळी आपल्या मुलांना घडविणाऱ्या आदर्श मातांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये महिला रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ स्मिता गवळी -सरोदे यांच्या आई, ‌ डॉ. चित्रा बोडके, विजय गायकवाड आदींसह इतरांना माता रमाई पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक