शंभूराजे महानाट्याचे उद्या उद्घाटन मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष धनंजय राऊत यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहुण कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन
नागरिकांसाठी मोफत पाहण्याची सुविधा
२० हजार नागरिकांना बसण्याची व्यवस्था
राहुल कोरे आळणीकर
उस्मानाबाद दि.८ (प्रतिनिधी) - अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, श्रीमंत योगी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंतीनिमित्त मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती, उस्मानाबादच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून प्रा. नितीन बानगुडे-पाटील लिखित एक धगधगते शंभुराजे हे महानाट्य उस्मानाबाद येथे प्रथमच सादर केले जाणार आहे. त्यासाठी मंडप उभारण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद येथील मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास आजच्या पिढीला समजावा यासाठी प्रा नितीन बानगुडे-पाटील लिखित शंभूराजे हे तीन भागात म्हणजे सलग तीन दिवस चालणारे महानाट्य उस्मानाबाद येथील मल्टीपर्पज हायस्कूल (मराठी कन्या प्रशाला) या मैदानावर दि. ११, १२ व १३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आले आहे. यासाठी १०० x ६० उभारण्यात येत असलेल्या मंडपाची पाहणी फुट स्टेज तयार करण्यात येत आहे. हे नाटक पाहण्यासाठी वीस हजार महिला व पुरुष बसतील या क्षमतेच्या खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र १० बेरिंकेटिंग कक्ष तयार करण्यात आले आहेत. तसेच स्टेटच्या मागे बॅक ग्राऊंड, मैदानावर लाईटची व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे लाईट गेली तर जनरेटर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व वाहन पार्किंगची व्यवस्था जुन्या अग्निशमन दलाच्या पाठीमागील मैदानावर करण्यात आली आहे. याची पाहणी मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष धनंजय राऊत यांनी केली. यावेळी अथर्व निंबाळकर आकाश सर जे सौरभ गायकवाड राजेश बंडगर प्रकाश घायाळ आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या महानाट्याचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजीराव सावंत यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके आदी
मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष धनंजय राऊत यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहुण कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन केले.
छाया राहुल कोरे आळणीकर