Skip to main content

आमदार सरोज अहिरेंच्या हिरकणी कक्षाच्या तक्रारीची घेतली तात्काळ दखल, 24 तासाच्या आत हिरकणी कक्ष सुरू

आमदार सरोज अहिरेंच्या हिरकणी कक्षाच्या तक्रारीची घेतली तात्काळ दखल, 24 तासाच्या आत हिरकणी कक्ष सुरू


आमदार सरोज अहिरेंच्या हिरकणी कक्षाच्या तक्रारीची घेतली तात्काळ दखल, 24 तासाच्या आत हिरकणी कक्ष सुरू.
राहुल कोरे धाराशिव
मुंबई.
काल देवळाली विधानसभेच्या विद्यमान आमदार माझ्या सहकारी सरोजताई अहिरे अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपल्या ५ महिन्याच्या बाळासह सहभागी झाल्या असता त्यांना हिरकणी कक्षात ज्या असुविधाना तोंड द्यावे लागले. त्या संदर्भात त्यांना मी येत्या २४ तासात सुसज्ज असा हिरकणी कक्ष उपलब्ध करून देईल अशी ग्वाही दिली होती. त्याप्रमाणे आज विधापरिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास जी दानवे यांच्या उपस्थितीत आया, नर्स, डॉक्टर, स्वच्छ बेड - पाळणा व इतर सुविधांनी सुसज्ज असा हिरकणी कक्ष सरोज ताई व त्यांच्या बाळाला उपलब्ध करून देण्यात आला. 

कक्षात केलेल्या व्यवस्थे बद्दल सरोजताई यांचे समाधान झाले व त्यांनी एवढ्या तत्परतेने तक्रारीची दखल घेत स्वतः जातीनिशी तक्रार निवारण केल्या बद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांचे आभार व्यक्त केले.

आपल्या कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडत कर्तव्यदक्ष असणाऱ्या महीला पोलिसांसाठी असे हिरकणी कक्ष येत्या काळात उभारण्याचा मानस आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी व्यक्त केला.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक