19 वर्ष वयोगटाचा मुलींचा संघ ठरला राज्यस्तरीय विजेता !

19 वर्ष वयोगटाचा मुलींचा संघ  ठरला राज्यस्तरीय विजेता !
उस्मानाबाद : येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीपतराव भोसले हायस्कूलचा मुलींचा खो-खो संघ प्रतिस्पर्धी नाशिकच्या संघास हरवून अंतिम विजेता ठरला.
   सांगली येथील विटा येथे झालेल्या 19 वर्ष वयोगटातील राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या मुलींच्या  संघाने लातूर विभागाचे प्रतिनिधीत्व करत अंतिम सामन्यात नाशिक संघाचा दणदणीत पराभव करून अंतिम विजेतेपद पटकावले .
     या संघाला मार्गदर्शक म्हणून  प्रशालेचे क्रीडा विभाग प्रमुख प्रवीण बागल व प्रा .विवेक कापसे यांनी मार्गदर्शन केले .     
  त्याचबरोबर क्रीडा शिक्षक अभिजीत पाटील व सर्व क्रीडा अध्यापकांचे संस्थेच्यावतीने आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील , संस्था सरचिटणीस प्रेमाताई पाटील , प्रशासकीय अधिकारी  आदित्य पाटील तसेच प्रशालेचे प्राचार्य एस.एस देशमुख , उपप्राचार्य एस . के . घार्गे , उपमुख्याध्यापक एस.बी. कोळी , पर्यवेक्षक वाय. के . इंगळे , श्रीमती बी. बी .गुंड , टी.पी . शेटे , आर .बी . जाधव , के. वाय. गायकवाड , डी . ए . देशमुख यांनी खेळाडू  आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन केले .

छाया राहुल कोरे आळणीकर

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक