15 ऑगस्ट चे ध्वजारोहण ग्रामपंचायत ची पूर्ण बाकी भरलेल्या कुटुंबातील महिलांच्या हस्ते
ग्रामसभा / कावळेवाडी /
ऐतिहासिक ठराव मंजूर
15 ऑगस्ट चे ध्वजारोहण ग्रामपंचायत ची पूर्ण बाकी भरलेल्या कुटुंबातील महिलांच्या हस्ते
राहुल कोरे आळणीकर
कावळेवाडी गावातील महिलांना सक्षमीकरण करण्याच्या दृष्टिकोनात तसेच महिलेचा मान व सन्मान वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत कावळेवाडीतील एक ऑगस्ट पर्यंत संपूर्ण घरपट्टी व नळपट्टी भरणाऱ्या कुटुंबातील महिलांच्या हस्ते 15 ऑगस्ट चे ध्वजारोहण करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आणि जास्त कुटुंबातील व्यक्तींनी ग्रामपंचायतची एक ऑगस्टपर्यंत बाकी भरल्यास चिठ्ठी टाकून ध्वजारोहण फडकवण्यासाठी महिलाची निवड करण्यात येईल असा ठराव ग्रामसभेमध्ये दिनांक6 रोजी मंजूर करण्यात आला सदरील ठराव हा गावचे सरपंच एडवोकेट अजित खोत यांनी मांडला