*राज्य सरकारी व इतर कर्मचारी यांचा 14 मार्चपासून बेमुदत संप*
*राज्य सरकारी व इतर कर्मचारी यांचा 14 मार्चपासून बेमुदत संप*
राहुल कोरे धाराशिव
धाराशिव / नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी या व इतर मागण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने 14 मार्चपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. या अनुषंगाने आज रोजी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व सरकारी-निमसरकारी कर्मचारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, नगरपालिका कर्मचारी यांच्या समन्वय समितीच्या वतीने मा.जिल्हाधिकारी यांना बेमुदत संपाचे निवेदन देण्यात आले.यावेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत शिंदे, सरचिटणीस बालाजी पांचाळ, उपाध्यक्ष शेख,संघटक रवि मोहिते, तसेच महसूल कर्मचारी संघटनेचे नितेश काळे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे नलावडे,राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे बशीर तांबोळी,आयटीआय निदेशक संघटनेचे गुडे व देशमुख, तंत्रशिक्षण कर्मचारी संघटनेचे गोपालसिंग डाबेराव आणि इतर पदाधिकारी व कर्मचारी बांधव उपस्थित होते.