*त्यागमुर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त राज्य स्तरीय पहिली धम्म परिषदेचे आयोजन...* परिषदेतील ठरावात तेर येथील बौध्द स्तुपाच्या संरक्षणासाठी नियोजन करावे.. सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे.

*त्यागमुर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त राज्य स्तरीय पहिली धम्म परिषदेचे आयोजन...* परिषदेतील ठरावात तेर येथील बौध्द स्तुपाच्या संरक्षणासाठी नियोजन करावे.. सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे.

राहुल कोरे उस्मानाबाद

*भुम* :- त्याग मुर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त दि.26 फेब्रुवारी 2023 रोजी भुम येथील आयोजक अधिकारी,कर्मचारी, बौध्द बांधव धम्म परिषद संयोजन समिती,भुम,ता.भुम जिल्हा उस्मानाबाद यांनी प्रथम राज्यस्तरीय पहिली धम्म परिषदेचे आयोजन केले आहे या देशालाच नव्हे तर संपुर्ण जगाला बौध्द धम्माच्या विचारांची गरज आहे,अडीच हजार वर्षे झाली तथागतांनी सांगितलेले विचार मानवी जीवनाला लाभदायक आहेत.बुध्द म्हणजे मुक्तीदाता नव्हे तर मार्गदाता असुन युध्दाला विराम देणारे शांतीदुत आहेत.आजही या भुमीतील उत्खननात बुद्ध धम्माचे दर्शन घडते,बौध्द धम्माचे अवशेष दिसतात, उस्मानाबाद जिल्ह्याला ऐतिहासिक असा वारसा लाभलेला आहे तगर तथा तेर हे प्राचीन वास्तुचे धार्मिक स्थळ म्हणुन प्रचलित आहे, वर्षानुवर्षे ऐतिहासिक बौध्द  वारसा डोकावणारा भाग आहे,तेर येथील बौध्द स्तुप जिल्ह्याचे वैभव असुन असे म्हणतात की,या स्तुपाची निर्मिती अडीच हजार वर्षे पुर्विची असुन मध्य प्रदेशातील सांची स्तूप हा त्याची साक्ष देतो,आनंद नावाच्या एका व्यापाऱ्याने हा स्तुप बांधण्यासाठी धम्मदान दिले असुन हा स्तुप त्यांनी बांधला आहे.असे त्या सांची स्तुपावर लिहिले आहे.जागतिक स्तरावर यांची नोंद असुन इतका मौल्यवान ठेवा आपल्याकडे आहे परंतु प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे.गरज राहिल वास्तवतेची..भुम येथील ऐतिहासिक ठरणा-या राज्य स्तरीय पहिली धम्म परिषदेत यांची नोंद घेऊन तेर येथील उत्खनन करून मुबलक प्रमाणात शासनाने यासाठी निधी उपलब्ध करून हा जागतिक बौध्द वारसा जोपासला गेला पाहिजे यासाठी धम्म परिषदेत ठराव मंजूर करून प्रशासनाकडे पाठपुरावा करावा असे मी याद्वारे आयोजन समितीला विनंती करतो..त्याग मुर्ती माता रमाई नगरीत होत असलेल्या पहिल्या राज्य स्तरीय धम्म परिषदेत आपण सर्वांनी सहभागी व्हावे... सहभागी भन्तेंना त्रिवार वंदन व सर्व आयोजक,नियोजक, येणाऱ्या मान्यवरांचे मनपुर्वक  अभिनंदन करतो व शुभेच्छा देतो.. गणेश रानबा वाघमारे सामाजिक कार्यकर्ता उस्मानाबाद.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक