राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार पक्ष) च्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी प्रतापसिंह भैया पाटील यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार पक्ष) च्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी प्रतापसिंह भैया पाटील यांची निवड

धाराशिव दि०४ (प्रतिनिधी):राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्रजी पवार पक्ष) च्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी प्रतापसिंह भैया पाटील यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी याबाबतचे नियुक्तिपत्र जारी केले असून, पाटील यांनी पक्षासाठी दिलेल्या निष्ठावान व सातत्यपूर्ण योगदानाची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आली आहे.
नियुक्तिपत्रात म्हटले आहे की, “पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम करून, सर्व समाजघटकांना सोबत घेत आपण पक्ष मजबूत कराल, अशी आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांचे विचार सर्वदूर पोहोचवावेत, हीच आमची इच्छा आहे.”
प्रतापसिंह भैया पाटील हे धाराशिव जिल्ह्यातील लोकप्रिय, समाजसेवी व दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. ते गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत असून, पक्षात फूट पडल्यानंतर देखील शरदचंद्र पवार यांच्या प्रति एकनिष्ठ राहिले आहेत. पक्ष बांधणी आणि कार्यकर्त्यांच्या समन्वयात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
त्यांच्या निवडीमुळे धाराशिव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.
दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी शरदचंद्र पवार यांची भेट घेऊन माजी जिल्हाध्यक्षांविरोधात नाराजी व्यक्त केली होती. जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजात पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेत असल्याची तक्रार करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पक्षाने नव्या नेतृत्वाची निवड करत प्रतापसिंह भैया पाटील यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे.

Popular posts from this blog

*ओमराजे आणि कैलास पाटील शिंदे गटात येणार? प्रताप सरनाईकांचे सूचक संकेत*शिवसेनेतील इन्कमिंगमुळे ठाकरे गटाला मोठी गळती लागणार? मंत्री सरनाईकांकडून 'ऑपरेशन टायगर' राबवण्याचे संकेत विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला मात्र काहीसी मरगळ आल्याचे चित्र आहे. यातच ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक जिल्ह्यातील माजी नगरसेवकांसह काही बड्या पदाधिकाऱ्यांनीही ठाकरेंची साथ सोडली आहे. यातच आता मंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव जिल्ह्यात 'ऑपरेशन टायगर' राबविण्याचे संकेत दिले आहेत.बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राजकीय विषयांवर देखील भाष्य केले. 'पुढे पुढे बघा काय होतंय, धाराशिव जिल्ह्यात बदल झाला तर विशेष वावगे वाटायला नको, असे सूचक विधान प्रताप सरनाईकांनी केले आहे. तर 'ऑपरेशन टायगर' राबवून ठाकरे गटाला खिंडार पडणार असल्याचे संकेत दिले आहेत.

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक

ऑनलाइन रम्मीच्या विळख्यातून कुटुंबाचा अंत — पत्नी व दोन वर्षाच्या मुलाचा खून करून तरुणाची आत्महत्या