लक्ष्मी बंडगर यांनी दिली शिवसेना उबाठाकडे मुलाखत - नगराध्यक्षपदासाठी इच्छुक
लक्ष्मी बंडगर यांनी दिली शिवसेना उबाठाकडे मुलाखत - नगराध्यक्षपदासाठी इच्छुक
धाराशिव - समय सारथी
धाराशिव नगराध्यक्ष पदासाठी श्रीमती लक्ष्मी दत्ता बंडगर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे मुलाखत दिली.धाराशिव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुका 2025 नगराध्यक्ष पद ओबीसी महिला करिता आरक्षित आहे. या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून धाराशिव शहरातील नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे कार्यालय पवन राजे कॉम्प्लेक्स या ठिकाणी शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख श्री मकरंद राजेनिंबाळकर आणि जिल्हाप्रमुख आमदार श्री.कैलासदादा पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या.
यावेळी नगराध्यक्ष पदासाठी धाराशिव नगरीचे माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर यांची जेष्ठ कन्या लक्ष्मी दत्ता बंडगर रा.भानू नगर यांनी मुलाखत दिली असून त्यांचे शिक्षण एम. ए. , बी एड झाले आहे. शहरातील नामांकित अभिनव इंग्लिश स्कूल येथे त्यांनी शिक्षिका म्हणून काम केले असून, शहरामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे . शहरातील महिलांना आर्थिक बचतीचे महत्त्व पटवून देऊन बचत गटांची निर्मिती केलेली आहे.
कोरोना काळानंतर 2020 पासून ते त्यांचा वडिलोपार्जित बेकरी व स्वीट मार्ट च्या व्यवसायात सक्रिया आहेत.तसेच 2005 मध्ये शहरातील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या विद्यापीठ प्रतिनिधी (यु आर) म्हणून निवडून आलेल्या होत्या. त्यांचे वडील दत्ता बंडगर हे शहरातील प्रसिद्ध मिठाई व बेकरी व्यावसायिक असून सन 2001 पासून ते नगरसेवक उपनगराध्यक्ष व यशस्वी नगराध्यक्ष म्हणून धाराशिव नगरपालिकेत काम केले आहे.
धाराशिव शहराच्या लोकसंख्येचा विचार करता अत्यंत आवश्यक अशी शहराची उजनी पाणीपुरवठा योजना प्रस्ताव केंद्र शासन व राज्य शासन समिती समोर सादर करून त्यांच्या नगराध्यक्ष काळामध्ये ही योजना मंजूर करून घेतली व त्या कामाची सुरुवात केली, त्या सोबतच रुईभर फिल्टर येथे एक व तेरणा फिल्टर येथे दोन पाणी टाक्यांचे बांधकाम पूर्ण करून जलशुद्धीकरण केंद्राची नूतनीकरण केले.
धाराशिव नगरपालिका सक्षम बनविण्यासाठी व शहरातील व्यापार वाढविण्याकरिता आरक्षण क्रमांक 52, 71,72 या ठिकाणी व शहर पोलीस स्टेशन शेजारी मोठ्या व्यापारी संकुलाची उभारणी केली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा महाराष्ट्र शासनाकडून मान्यता घेऊन त्याची यशस्वीपणे उभारणीचे काम दत्ता बंडगर यांच्या नगराध्यक्ष पदाच्या काळात करण्यात आले.
धाराशिव शहरातील ग्रामदैवत असलेले धारासुर मर्दिनी मंदिर व खाजा शमशुद्दीन गाझी रहमतुल्लाआली दर्गाह
परिसर सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन विभाग यांचे कडून तीर्थक्षेत्र विकास निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून आवश्यक कामे पूर्ण केली. नेहरू चौक ते दर्गाह पर्यंत रस्ता रुंदीकरण व नवीन पुलाची बांधणी केली. शहराच्या मध्यभागी असलेल्या जिजामाता उद्यान, रामनगर येथील उद्यान,समता नगर, खरोसे कर कॉलनी येथील उद्यान कामासाठी निधी मंजूर करून, त्या बगीच्यांची उभारणी करून शहरातील लहान मुले व जनतेसाठी बगीचा उपलब्ध करून दिल्या.
अत्यंत दयनीय अवस्थेत असलेल्या धाराशिव शहरातील सर्व जातीधर्माच्या स्मशानभूमी दुरुस्त्यांची कामे करून त्या सुशोभित केल्या.धाराशिव शहरामध्ये आवश्यक त्या ठिकाणी फायबरचे शौचालय, प्रत्येक चौका चौकामध्ये फायबर डस्टबिन बसवण्याचे कामही करण्यात आले. धाराशिव शहरामध्ये सर्वप्रथम कचरा संकलन करण्याची संकल्पना त्यांनी अस्तित्वात आणून घंटा गाड्यांची सुरुवात करून शहर घनकचरा संकलन योजना प्रभावीपणे राबवली. नागरिकांना धाराशिव नगरपालिकेतील सर्व योजनांची माहिती सहजपणे उपलब्ध होण्यासाठी टच स्क्रीन मशीनची उभारणी कार्यालयाच्या आवारात केली.
नगरपालिका कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी नवीन फर्निचर केबिन बनवून कार्यालयाचे सुशोभीकरण करण्यात आले.नगरपरिषद कार्यालयीन कर्मचारी यांची संहिता विचारात घेता कर्मचारी आकृतीबंध कार्यक्रम नगरपरिषद संचालनालय व राज्य शासनाकडून मान्य करून घेऊन बरेच प्रतीक्षा यादीतील कर्मचारी नोकरीत कायम करण्याचे प्रशासन स्तरावर अतिशय मोलाचे योगदान.
माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर यांनी धाराशिव शहरासाठी केलेल्या विकास कामांच्या जोरावर लक्ष्मी दत्ता बंडगर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत दिली. दत्ता बंडगर यांची अभ्यासपूर्वक प्रशासन चालवण्याची हातोटी, राज्य शासन,केंद्र शासन यांच्याकडून शहर विकास कामांच्या योजना साठी अर्थसहाय्य मिळविण्याचा अनुभव. शासन स्तरावरील त्यांचे अधिकारी व पदाधिकाऱ्यांशी असलेला परिचय. या सर्व बाबी विचारात घेता लक्ष्मी दत्ता बंडगर यांची उमेदवारी अपेक्षित असून त्या विजयी होतील असे जनतेत बोलले जात आहे.