*धाराशिव, कळंब नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासमवेत चर्चा*
*धाराशिव, कळंब नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासमवेत चर्चा*
धाराशिव -
निवडणूक आयोगाने राज्यातील नगर परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन धाराशिव आणि कळंब नगर परिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीबाबत चर्चा केली.
ठाणे निवासस्थान येथे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी धाराशिव आणि कळंब नगर परिषदेच्या निवडणुकीत पक्षाची भूमिका काय असावी याबाबत शिवसैनिकांच्या भावना व्यक्त केल्या. एकनाथजी शिंदे साहेब यांनी निवडणुकीच्या रणनीतीबाबत मार्गदर्शन केले.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे धाराशिव आणि कळंब तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढली असून याचा नगर परिषद निवडणुकीत पक्षाला मोठा फायदा होईल असे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी सांगितले.