*_धाराशिव जिल्ह्यात हजार उद्योजक घडवण्याचे स्वप्न – आमदार सुभाष देशमुख_*
*_धाराशिव जिल्ह्यात हजार उद्योजक घडवण्याचे स्वप्न – आमदार सुभाष देशमुख_*
*लोकमंगल बँक व मल्टीस्टेटतर्फे कर्ज मेळावा व दिवाळी स्नेहफराळ कार्यक्रम*
तुळजापूर प्रतिनिधी :-
“_शासनाच्या अनेक लाभदायक योजना उपलब्ध आहेत. नोकरी मिळेलच याची वाट पाहण्यापेक्षा उद्योजक बनून स्वतःचा व्यवसाय सुरू करा. धाराशिव जिल्ह्यातून किमान एक हजार उद्योजक घडवण्याचे माझे स्वप्न आहे, त्यासाठी सर्वांनी पुढे यावे,_” असे प्रतिपादन लोकमंगलचे संस्थापक अध्यक्ष व आमदार सुभाष देशमुख यांनी केले.
लोकमंगल बँक आणि लोकमंगल मल्टीस्टेट यांच्या वतीने धाराशिव येथे कर्ज विषयक मेळावा व दिवाळी स्नेहफराळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना आमदार सुभाष देशमुख म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजना उपलब्ध आहेत. सावकाराच्या जाळ्यात अडकण्याऐवजी या योजनांचा लाभ घेऊन आर्थिक सक्षम व्हा. स्वतःबरोबर आपले गाव आणि जिल्हाही आर्थिकदृष्ट्या सक्षम करा.”
रोहन देशमुख म्हणाले,
“प्रत्येक कार्यकर्त्याने किमान पाच उद्योजक तयार केले, तर धाराशिव जिल्हा ‘उद्योजकांचा जिल्हा’ म्हणून ओळखला जाईल.”
यावेळी सुभाष देशमुख यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, आपण सोलापूरात गेलो असलो तरी उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्याशी आपली नाळ तुटलेली नाही. या कार्यक्रमात विविध महामंडळांकडून पाच कोटी रुपयांच्या धनादेशांचे वाटप करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
या कार्यक्रमास चेअरमन पंडित लोमटे, बालाजी शिंदे, सचिन आडगळे, राजेंद्र पाटील, अजय ढोणे,पांडुरंग डोलारे, तसेच लोकमंगल मल्टीस्टेटचे सीईओ सचिन जाधव,रामदास कोळगे,विक्रम (मालक) देशमुख, संतोष बोबडे,एड. दीपक आलूरे, सचिन पाटील सभापती, सज्जन साळुंखे, प्रभाकर मुळे,आनंद कंदले,यांच्यासह धाराशिव जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व लोकमंगल मल्टीस्टेटचे सल्लागार, कर्जदार,सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.