जि प प्रशाला जागजी प्रशालेतील कुमारी ढेकणे अर्पिता अनंत हिचे जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश
जि प प्रशाला जागजी प्रशालेतील कुमारी ढेकणे अर्पिता अनंत हिचे जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश
धाराशिव जि प प्रशाला जागजी प्रशालेतील कुमारी ढेकणे अर्पिता अनंत हिचे जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे स्पर्धा दिनांक 09/10/2025 रोजी शालेय मैदानी स्पर्धा तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव येथे झालेल्या 200 मीटर धावणे या वैयक्तिक क्रीडा प्रकारात जि प प्रशाला जागजी तालुका जिल्हा धाराशिव इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कुमारी ढेकणे अर्पिता अनंत ही जिल्हास्तरावर द्वितीय आली आहे व तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे या यशाबद्दल तिचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चंदनशिवे मॅडम व क्रीडा शिक्षक श्री आडे सर श्री जाधव सर व प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उपाडे उपाध्यक्ष सविता पांगरकर व सर्व सदस्य पालक ग्रामस्थ यांनी तिचे कौतुक केले आहे जिल्हाभरातून अभिनंदन चा वर्षाव होत आहे व तिला विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या