धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्था निवडणुकी ची भाजपची तयारी पूर्ण- दत्ताभाऊ कुलकर्णी

धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्था निवडणुकी ची भाजपची तयारी पूर्ण- दत्ताभाऊ कुलकर्णी

आमदार राणाजगजितसिंह पाटील व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर व माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बूथनिहाय रणनीती आखणी

धाराशिव- जिल्ह्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था भाजपच्या ताब्यात आणण्याची आमची तयारी पूर्ण झाली असल्याचा दृढ विश्वास भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील आठ नगरपालिका, आठ पंचायत समित्या तसेच जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी पक्षाकडून संघटित व शिस्तबद्ध मोहीम सुरू असून, आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही रणनीती आखण्यात येत आहे. पक्ष संघटनेत उत्साहाचे वातावरण असून, प्रत्येक प्रभाग व बूथनिहाय कार्यकर्त्यांची बांधणी सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आढावा बैठका घेऊन स्थानिक मुद्द्यांचा अभ्यास करण्यात येत आहे. विरोधकांच्या ताब्यात असलेल्या पालिकेत त्यांनी केलेल्या कारभाराच्या त्रुटींचा व लोकांना येणाऱ्या स्थानिक अडचणींचा बारकाईने अभ्यास करून, विकासाच्या योजना प्रभावीपणे राबवण्याची आखणी केली जात आहे. धाराशिव जिल्हा परिषदेत ५५ जागा, आठ पंचायत समित्यांमध्ये ११० सदस्य आणि आठ नगरपालिकांमध्ये सुमारे १७५ जागा असून, या सर्व ठिकाणी भाजपने स्वबळावर विजय मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी मित्रपक्षांसोबत युतीबाबत चर्चाही सुरू असल्याचेच सांगितले. तसेच केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याचा लाभ घेत जिल्ह्याच्या विकासाचा नवा आराखडा राबवण्याची तयारी पक्षाने पूर्ण केली आहे. ग्रामीण तसेच शहरी भागात भाजपची पकड दिवसेंदिवस मजबूत होत असून, कार्यकर्त्यांमधील उत्साह आणि जनतेचा वाढता विश्वास पाहता जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था भाजपच्या ताब्यात येतील, असा आत्मविश्वास जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे.

Popular posts from this blog

*ओमराजे आणि कैलास पाटील शिंदे गटात येणार? प्रताप सरनाईकांचे सूचक संकेत*शिवसेनेतील इन्कमिंगमुळे ठाकरे गटाला मोठी गळती लागणार? मंत्री सरनाईकांकडून 'ऑपरेशन टायगर' राबवण्याचे संकेत विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला मात्र काहीसी मरगळ आल्याचे चित्र आहे. यातच ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक जिल्ह्यातील माजी नगरसेवकांसह काही बड्या पदाधिकाऱ्यांनीही ठाकरेंची साथ सोडली आहे. यातच आता मंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव जिल्ह्यात 'ऑपरेशन टायगर' राबविण्याचे संकेत दिले आहेत.बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राजकीय विषयांवर देखील भाष्य केले. 'पुढे पुढे बघा काय होतंय, धाराशिव जिल्ह्यात बदल झाला तर विशेष वावगे वाटायला नको, असे सूचक विधान प्रताप सरनाईकांनी केले आहे. तर 'ऑपरेशन टायगर' राबवून ठाकरे गटाला खिंडार पडणार असल्याचे संकेत दिले आहेत.

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक

ऑनलाइन रम्मीच्या विळख्यातून कुटुंबाचा अंत — पत्नी व दोन वर्षाच्या मुलाचा खून करून तरुणाची आत्महत्या