आकाशवाणी पिटीसी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी देविदास पाठक यांची निवड
============================
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात काम करणाऱ्या आकाशवाणीच्या पिटीसी जिल्हा वार्ताहर संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी धाराशिव येथील आकाशवाणीचे जिल्हा प्रतिनिधी श्री देवीदास पाठक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.27 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे आकाशवाणी वार्ताहरांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, या दरम्यान झालेल्या संघटनेच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. पिटीसी संघटनेच्या महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी जळगाव येथील श्री राजेश यावलकर यांची तर वाशिम येथील जिल्हा प्रतिनिधी श्री सुनील कांबळे यांची प्रदेश सचिव पदी निवड करण्यात आली.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधींनी यावेळी आगामी काळात करावयाच्या विविध विषयावर चर्चा केली . तसेच पिटीसी संघटनेची पुढील काळात घ्यावयाची भूमिका यावर विचार मंथन केले.