*जिल्हा परिषद ढोकी गटातून सौ मनीषाताई केंद्रे सर्वात योग्य उमेदवार -जनतेचा विश्वास वाढला*
*जिल्हा परिषद ढोकी गटातून सौ मनीषाताई केंद्रे सर्वात योग्य उमेदवार -जनतेचा विश्वास वाढला*
धाराशिव:- धाराशिव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा असलेला ढोकी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणासाठी नुकतिच आरक्षण सोडत जाहीर झाली. जिल्हा परिषद गट एसटी या प्रवर्गासाठी
सुटला आहे. इच्छुकाची आत्तापासूनच मोर्चा बांधणी करण्यात येत आहे. या गटातून भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान जिल्हा चिटणीस व माजी प्रदेश कार्यकारणी सदस्य सौ. मनीषाताई नवनाथ केंद्रे यांना उमेदवारी देण्याची मागणी जोर धरत आहे.
केंद्रे ह्या उच्चशिक्षित असून त्या शिक्षिका आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील व अर्चनाताई पाटील यांच्या विश्वासू व एकनिष्ठ कार्यकर्त्या आहेत. त्यांचे मूळ गाव हे ढोकी जिल्हा परिषद गटातील कावळेवाडी आहे. सन 2012 ते 2022 पर्यंत सलग दहा वर्षे ग्रामपंचायत च्या सदस्य. दरम्यान 2014 ते 15 एक वर्ष प्रभारी सरपंच व 2014 ते 17 ग्रामपंचायतचे सलग तीन वर्ष उपसरपंच म्हणून त्यांनी कावळेवडी येथे त्यांनी कामकाज पाहिले आहे. त्यांना कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे.
पंधरा वर्षापासून सामाजिक कामात त्या सक्रिय भाग घेत आहेत. महिलांच्या प्रश्नावर त्या काम करत असताना त्यांच्या अडचणी व शासनाच्या सर्व योजना घराघरात पोचवणयचे ते काम करत आहेत. गेल्या पंधरा वर्षंपासून समाजकारणासह बीजेपीच्या माध्यमातून गरीब,अन्याय ग्रस्त, तसेच पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणे जनतेच्या सुखदुःखामध्ये सतत सोबत राहून समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी त्या नेहमी कटिबद्ध असतात.
ढोकी जिल्हा परिषद गटात कार्यकर्ते व नागरिकाशी त्यांचा घनिष्ठ परिचय झाला आहे. सेवाकाळात त्यांनी सर्वांना मदतीचा हात दिला असून, समाजातील प्रत्येक घटकात आपुलकी आणि विश्वास निर्माण केला आहे.
शासकीय योजनेतून नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असतात. मी ही जिल्हा परिषद लढवावी अशी मागणी मतदार करत आहेत. पक्षाने नारीशक्ती सन्मान करून उमेदवारी दिल्यास मी निवडून येईल. पक्षाने जनतेची सेवा करण्याची संधी मला द्यावी अशी मागणी सौ. मनिषाताई केंद्रे यांनी केली आहे. ढोकी जिल्हा परिषद गटात भाजपच्या विचाराशी जोडलेले मतदार असून, विजय निश्चित आहे. त्यामुळे पक्षाने हा मतदार संघ भाजपकडे घेवून मला उमेदवारी दिल्यास मी ढोकी जिल्हा परिषद गटात पक्षश्रेष्ठीच्या नेतृत्वात विकासात्मक राजकारणावर भर देईल असे सौ. केंद्रे यांनी सांगितले.