आधुनिक AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ऐकरी ऊसवाढीसाठी प्रयत्न करणार - दत्ताभाऊ कुलकर्णी

आधुनिक AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ऐकरी ऊसवाढीसाठी प्रयत्न करणार - दत्ताभाऊ कुलकर्णी
श्री सिद्धीविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीज लि.चा पाचवा मोळी पूजन सोहळा उत्साहात पार पडला

तुळजापूर - तालुक्यातील देवकुरळी येथील श्री सिद्धीविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीज लि. कारखान्याच्या पाचव्या मोळी पूजनाचा सोहळा शुक्रवार, दिनांक २४ रोजी मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात पार पडला. या वेळी अणदूर येथील श्री निळकंठेश्वर मठाचे मठाधिपती श्री.श्री.श्री. १००८ शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी तसेच श्री सद्गुरू शिवराम बुवा संस्थांचे ह.भ.प. विवेक महाराज दिंडेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सोहळ्यास श्री सिद्धीविनायक परिवाराचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, कारखान्याचे संचालक दिनेश कुलकर्णी, बालाजी कोरे, गणेश कामटे, राजकुमार जाधव, देविदास कुलकर्णी, ॲड. नितीन भोसले, देवकुरळीचे हनुमंत जाधव, पांडुरंग चव्हाण, बालाजी शिंदे, केशेगावचे सरपंच मल्लिनाथ गावडे, नारायण नन्नावरे, नागेश नाईक, राजाभाऊ पवार, दत्ताभाऊ राजमाने, साहेबराव घुगे, शिवाजी बोधले, आशिष सोनटक्के, अण्णासाहेब सरडे, विजय शिंगाडे, मंगेश कुलकर्णी, संजीव चिलवंत, मकरंद धोंगडे, शुभम मिंढे आदी मान्यवरांसह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी श्री सिद्धीविनायक परिवाराचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी शेतकऱ्यांना सन्मानजनक भाव देणे, हेच आमचे प्रमुख ध्येय असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच कारखान्याचे काम पुढे नेऊ. तसेच आधुनिक AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ऐकरी ऊसवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी ह.भ.प. विवेक महाराज दिंडेगावकर आणि श्री श्री शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यांनी कारखान्याच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत श्री सिद्धीविनायक ॲग्रीटेक परिवाराचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी विशेष शुभेच्छा दिल्या.

Popular posts from this blog

*ओमराजे आणि कैलास पाटील शिंदे गटात येणार? प्रताप सरनाईकांचे सूचक संकेत*शिवसेनेतील इन्कमिंगमुळे ठाकरे गटाला मोठी गळती लागणार? मंत्री सरनाईकांकडून 'ऑपरेशन टायगर' राबवण्याचे संकेत विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला मात्र काहीसी मरगळ आल्याचे चित्र आहे. यातच ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक जिल्ह्यातील माजी नगरसेवकांसह काही बड्या पदाधिकाऱ्यांनीही ठाकरेंची साथ सोडली आहे. यातच आता मंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव जिल्ह्यात 'ऑपरेशन टायगर' राबविण्याचे संकेत दिले आहेत.बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राजकीय विषयांवर देखील भाष्य केले. 'पुढे पुढे बघा काय होतंय, धाराशिव जिल्ह्यात बदल झाला तर विशेष वावगे वाटायला नको, असे सूचक विधान प्रताप सरनाईकांनी केले आहे. तर 'ऑपरेशन टायगर' राबवून ठाकरे गटाला खिंडार पडणार असल्याचे संकेत दिले आहेत.

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक

ऑनलाइन रम्मीच्या विळख्यातून कुटुंबाचा अंत — पत्नी व दोन वर्षाच्या मुलाचा खून करून तरुणाची आत्महत्या